
प्रसाद कानडे
पुणे : पीएमपीचा ‘प्रवास’ आता ‘हायड्रोजन’च्या दिशेने होणार आहे. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात ‘हायड्रोजन बस’ दाखल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ‘हायड्रोजन’वरील दोन बस धावणार आहेत. यासाठी पीएमपी प्रशासन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांची मदत घेणार आहे. तसेच ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील चर्चा सुरू झाली आहे.