
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकात अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, हे लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी (ता. १) ५०हून अधिक बस मार्गांत बदल केला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपाचा असणार आहे. दुपारनंतर मार्गात बदल होईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.