

Loni Kalbhor
esakal
लोणी काळभोर: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वारंवार नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याप्रकरणी एका विकासकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन व निष्कासन विभागातील शाखा अभियंता (कंत्राटी) प्रणव दिलीप डेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्योजक हेमंत हाडके (रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पूर्व हवेलीत शेकडो अनधिकृत बांधकामे आणि मोठे प्रकल्प सुरू असल्याची चर्चा असून, त्या विकासकांवरही पीएमआरडीए कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.