
प्रदीप लोखंडे
पिंपरी : पुणे महानगर क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाणी व्यवस्थापन गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने २३० गावांमध्ये आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा हाती घेतला आहे.