पिंपरी : हिंजवडी भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशा कामांना प्राधान्य देण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले. .हिंजवडी, माण, मारुंजी यासह इतर काही भागात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए कार्यालयात आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते..या वेळी आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीए विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी - पाटील आदींसह एमआयडीसी, एमपीसीबी, पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड, जिल्हा परिषद, एमएसईडीसीएल, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन, पीसीएमसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडीतील कंपन्यांचे प्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, एमएसईटीसीएल, वाहतूक पोलिस, हिंजवडी, माण, मारुंजी या ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. .ओढे - नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे प्रामुख्याने या समस्या पुढे येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरील सर्व यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करून ओढे - नाल्यांची स्वच्छता करत रस्त्यावरील राडारोडा तातडीने उचलून घेण्याचे आदेश यावेळी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. हिंजवडी भागात सुरू असलेल्या मेट्रोसह इतर कामांमुळे रहदारीस अडचणी ठरत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने आपली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. यासह नागरी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत म्हसे यांनी दिले..नाल्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाईहिंजवडी, माण, मारुंजी यासह इतर भागातील नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नाल्याभोवती उभारण्यात आलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून संबंधित बांधकामे अधिकृत आहेत की अनधिकृत, याचा अहवाल तातडीने सादर करावा. अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठकीत दिले. यासह काही कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. अशा कंपन्यांची चौकशी करावी, त्यांची बांधकामे अनधिकृत असेल तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.