PMRDA
sakal
पिंपरी : क्षेत्रीय पाहणीपासून अनधिकृत बांधकामांची नोंद, भूखंडांची पडताळणी आणि विकासकामांच्या आढाव्यापर्यंतच्या विविध कामांचा वेळ कमी व्हावा, तसेच ही प्रक्रिया अचूक होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंतर्गत सर्व तालुक्यांत या माध्यमातून जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम (जीआयएस) ॲप्लिकेशनचा वापर प्रभावी ठरेल.