
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) इंद्रायणी आणि पवना ही नदीसुधार योजना हाती घेतली आहे. ती मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करून निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.