

Officials inspected the site and examined the construction quality after the incident raised concerns over the project's execution.
Sakal
सुनील जगताप,
उरुळीकांचन : मुळा-मुठा नदीवरील खामगावटेक ते हिंगणगाव (ता.हवेली) या दरम्यान उभा राहत असलेल्या पुलाचे गर्डर कोसळून पुलाच महत्वाचा भाग जमीनदोस्त झाल्याच्या प्रकारानंतर व त्याची प्रसिद्धी प्रसार माध्यमातून झाल्यावर पुणे क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अधिकारी जागे झाले व या पुलाच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले गेल्याची माहिती समोर आली आहे.काल सकाळने डिजिटल प्रसार माध्यमावर पूल कोसळल्याच्या बातमी प्रसारित केली अन रात्रीत कोसळलेले गर्डर नाहीसे झालेचा प्रकार आज उघडकीस आला.