

New Structural Plan Implementation
Sakal
पिंपरी : नव्याने रचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करून अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात २४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची छाननी सध्या सुरू आहे.