किरकटवाडीतील अनधिकृत बांधकामांवर 'पीएमआरडीए'चा हातोडा

सदनिका व गाळे जमिनदोस्त; मोठा फौजफाटा तैनात
Destroy unauthorized constructions
Destroy unauthorized constructionsSakal

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी गावच्या हद्दीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडून धडक कारवाई करत नियमबाह्य असलेल्या काही सदनिका व गाळे जमिनदोस्त करण्यात आले. घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून अग्निशमन दल,महावितरण व पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरकटवाडीतील शिवनगर व नाना नगर परिसरातील काही नागरिकांनी पीएमआरडीए च्या अनधिकृत बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. बांधकाम परवानगी घेताना प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्याव्यतिरिक्त पार्किंगमध्ये सदनिका व गाळे बांधण्यात आल्याचे या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते. त्या तक्रारींची खातरजमा करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून सदर कारवाई करण्यात आली.

फौजफाटा पाहून नागरिकांची धावपळ

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेकडून काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगोदरच नागरिकांच्या मनात अतिक्रमण कारवाईबाबत भीती निर्माण झालेली असताना अचानक पुन्हा मोठा फौजफाटा दाखल झाल्याने व्यावसायिक व नागरिकांची धावपळ उडाली होती. नेमकी कोठे कारवाई होणार याबाबत कोणालाही माहिती नसल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते.

"नागरिकांच्या तक्रारींवरून सदर कारवाई सुरू आहे. काही सदनिका व गाळे अनधिकृतपणे बांधण्यात आले होते ते पाडण्यात येत आहेत. अजून काही ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे."

- बजरंग चौगुले, तहसीलदार, अनधिकृत बांधकाम विभाग, पीएमआरडीए.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com