- प्रसाद कानडे
पुणे - पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसंगत आणि प्रवासीकेंद्रित करण्यासाठी मेट्रोकडून स्वारगेट येथे ‘मल्टिमोडल हब’चा प्रकल्प साकारत आहे. मेट्रोने भुयारी स्थानक व मार्ग तयार केल्यानंतर आता या प्रकल्प साकारण्याच्या दिशेने पावले पडायला सुरवात झाली आहे.