

Construction of the POCSO court building underway in Shivajinagar, Pune.
esakal
पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या ‘पोक्सो’ (बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आता ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. इमारतीचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत.