

Heavy Rain in Pokharkarwadi
esakal
घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पोखरकरवाडी, पाताडेवस्ती परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकरी विशाल बांगर यांच्या घरासमोरील व परिसरातील मुख्य रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने यावर दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी उघडून दिला .परंतु दोन दिवसांच्या पावसाने हा तात्पुरता रस्ता पुन्हा वाहून गेल्याने संपूर्ण परिसराचा संपर्क तुटला असल्याची माहिती स्थानिक रहिवासी सुखदेव मधे यांनी दिली .