

Theft of agricultural pump cables in Kusur Junnar village
esakal
जुन्नर : कुसुर ता. जुन्नर येथे वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती पंपाच्या केबलची चोरी करणाऱ्या तीन युवकांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवार ता. 23 रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. जवळपास 1850 मीटर लांबीच्या 4 लक्ष 62 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलत केबल चोरी करणाऱ्या या टोळीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. या घटनेमध्ये सुनिल सुरेश पवार वय 25 वर्ष, सुनिल बाळु हेलम वय 29 वर्ष, अंकुश रघुनाथ मुकणे वय 30 वर्ष सर्व रा. वाजळे ता. मुरबाड जि. ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद राजेंद्र गणपत भगत यांनी दिली.