DJ लावून निघाली शाही वरात, पोहोचली थेट पोलीस ठाण्यात  

police action against Groom and his Family by DJ marriage
police action against Groom and his Family by DJ marriage

किरकटवाडी: डिजेच्या तालावर नाचण्यात दंग झालेले मित्रमंडळी आणि नातेवाईक, सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी आणि शाही थाटात लग्नच्या आदल्या दिवशी देवदर्शनासाठी नवरदेव निघालेला असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांची एंट्री होते. संतापलेले अधिकारी तात्काळ मिरवणूक थांबवतात आणि नवरदेवासह इतरांना थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन नियम पायदळी तुडवत जमवलेली गर्दी, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक आरोग्यास बाधा होईल असे वर्तन करणे व इतर नियमांखाली पाच जणांवर गुन्हे दाखल करतात. खडकवासला (ता. हवेली) येथील तरुणाला आपला लग्नसोहळा थाटामाटात करण्याचा हट्ट चांगलाच महागात पडला आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी डिजे, वाजंत्री व शाही सजावटीत देवाच्या पाया पडण्यासाठी शंभर ते दीडशे नातेवाईक व मित्रमंडळींसह नवरदेव निघाला होता. यामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करण्यात आला होता. हा सर्व प्रकार सुरू असताना हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम फौजफाटा घेऊन खडकवासला गावात आले. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवाणगी सदर कार्यक्रमासाठी घेण्यात आली नव्हती. नम यांनी नवरदेव, नवरदेवाचा भाऊ, आई, वडील व आणखी एक अशा पाच जणांना मिरवणुकीतून थेट पोलीस ठाण्यात घेऊन जात आपत्ती व्यवस्थापन कायदा व विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"कोरोना रुग्नसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आहेत.त्यानुसार  पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास दोनशे नागरिकांवर मास्क न वापरल्याने प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. या देवाला पाया पडण्यासाठी जाण्याच्या कार्यक्रमात संबंधितांचे अत्यंत बेजबाबदार वर्तन दिसून आले आहे.नवरदेवासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लग्नसोहळ्यावरही आमचे लक्ष असणार आहे. नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे." नितीन नम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com