police action criminals arrested in Mocca crime from Karnataka ahmednagar
police action criminals arrested in Mocca crime from Karnataka ahmednagarsakal

Pune Crime : मोकाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना कर्नाटकातून अटक

आरोपींविरुद्ध वाहनांची तोडफोड करण्यासह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
Published on

पुणे : संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बंगळूरमधून, तर अन्य एकाला अहदमनगरमधून अटक केली. या आरोपींविरुद्ध वाहनांची तोडफोड करण्यासह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

अजय चंद्रकांत विटकर (वय २२), ऋषिकेश ऊर्फ बबल्या सुनील देवकुळे (वय १९) आणि अनिकेत ऊर्फ डॅनी शंकर मंगळवेढेकर (वय २२, तिघे रा. वडारवाडी, गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोका आणि विविध गुन्ह्यांतील फरारी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

police action criminals arrested in Mocca crime from Karnataka ahmednagar
Ahmednagar Crime : ज्याला जन्म दिला, पोटाला चिमटे घेऊन लाडात वाढविले, त्यानेच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल मोकाच्या गुन्ह्यातील तिघे सराईत गुन्हेगार फरार होते. त्यापैकी विटकर आणि देवकुळे हे दोघे बंगळूर शहरात लपून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने दोघांना बंगळूरमधून ताब्यात घेतले.

police action criminals arrested in Mocca crime from Karnataka ahmednagar
Ahmednagar Crime : कामठीतील मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

तसेच, अनिकेत मंगळवेढेकर हा अहमदनगर एमआयडीसी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट चारच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com