पुणे - आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या २० जून ते २३ जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील. या पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.