माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या व व फरारी आरोपीला पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

'गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेला व पोलिसांना चकवा देणारा माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिसांनी शिताफीने केली अटक.

माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या व व फरारी आरोपीला पोलिसांनी केली अटक

मंचर - 'गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेला व पोलिसांना चकवा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता उमेश नामदेव इचके (रा. नागापूर, ता. आंबेगाव) याला मंचर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. घोडेगाव न्यायालयाने आरोपीला शनिवार (ता. २४) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.' अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.

ते म्हणाले, 'माहिती आधिकार कार्यकर्ता म्हणून इचके याने मंचर व पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर, रांजणी, वळती या भागातील सामान्य नागरीकांना कायद्याचा व माहिती अधिकार कायद्याचा धाक दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. काही जणांकडून तर त्याने खंडणी हि घेतली होती. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली.

तक्रारीची शहानिशा करून त्याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे व नारायणगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. पोलिस त्याच्या मागावर होते पण तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. बुधवारी (ता. २१) इचकेला अटक करण्यात आली आहे.' दरम्यान इचके याच्या उपद्रवामुळे अनेक प्रशासनातील अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक त्रस्त झाले होते . पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

'माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून उमेश नामदेव इचके याने कोणाला धमकी किंवा आर्थिक फसवणूक केली असल्यास नागरिकांनी न घाबरता मंचर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.'

- सतीश होडगर, पोलीस निरिक्षक, मंचर पोलीस ठाणे

Web Title: Police Arrested Extortionist And Absconding Accused Showing Fear Of The Right To Information Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..