Pune Crime : कोंढव्यात हॉटेलमध्ये बिलावरुन वाद झाल्यामुळे कामगारांकडून व्यावसायिकासह तिघांना बेदम मारहाण

हॉटेलच्या व्यवस्थापकासह कामगाराला अटक
police case businessman beaten up by hotel workers in Kondhwaya pune crime marathi news
police case businessman beaten up by hotel workers in Kondhwaya pune crime marathi news esakal
Updated on: 

पुणे : हॉटेलमध्ये बिलावरुन वाद झाल्यामुळे कामगारांनी व्यावसायिकासह तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना कोंढव्यातील एनआयबीएम परिसरात घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापकासह कामगाराला अटक केली आहे.

या प्रकरणी हुजेफा मुस्तफा अत्तरवाला (वय ३८, रा. गंगा फ्लोरेंटिना, एनआयबीएम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेलमधील व्यवस्थापकासह तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक प्रशांत जामेकर सामल (वय ३८, रा. घुले वस्ती, उंड्री), कामगार मौसम कमानसिंग कुंवर (वय २७, रा. होले वस्ती, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तरवाला हे मित्रांसमवेत दुपारी स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. बिलात लावलेल्या इतर सेवा कराबाबत अत्तरवाला यांनी व्यवस्थापकाकडे विचारणा केली. त्यावरून सामल याने अत्तरवाला यांच्याशी वाद घातला. त्यावेळी सामल,

कुंवर आणि इतर कामगारांनी अत्तरवाला यांच्या डोक्यात बाटली आणि काचेची बरणी मारली. तसेच, अत्तरवाला यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांच्या डोक्यातही हत्याराने वार केले. त्यात अत्तरवाला आणि त्यांच्या मित्रांना गंभीर दुखापत झाली. याबाबत पोलिसांनी आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय वगरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shirur Crime
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
Satara 17-year-old girl death case
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Marathi News Esakal
www.esakal.com