Loni kalbhor Crime : तडीपारीचा आदेश धुडकावणा-यास पोलिसांनी पाठलाग करून घेतले ताब्यात

तडीपार केलेले असतानाही तडीपारीचा आदेश धुडकावून लोणी काळभोरमध्ये प्रवेश करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Ganesh Virkar

Ganesh Virkar

sakal

Updated on: 

लोणी काळभोर - पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही तडीपारीचा आदेश धुडकावून लोणी काळभोरमध्ये प्रवेश करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विरकर वस्ती परिसरात शेतातील झाडाखाली बसलेल्या या गुन्हेगाराला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही कारवाई बुधवारी (ता. १८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

Loading content, please wait...