मावळ : राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचार थांबेनात. कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली तर पुण्यातील दोन चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात समोर आला आहे.