पुणे - मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. बबन अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. पोलिस उपायुक्त हृषीकेश रावले यांनी हवालदाराला निलंबित करण्याचा आदेश दिला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. वाघ १७ जुलै २०२६ पासून कोणतीही सूचना न देता कामावर गैरहजर होता. ४ सप्टेंबरला त्याने दारूच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली..याबाबतचा अहवाल चतुःशृंगी पोलिसांनी अहवाल शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीषकुमार दिघावकर यांच्याकडे पाठविला. वाघ याच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.