
पुणे - सराफी व्यावसायिकाशी असलेल्या ओळखीतून उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे सव्वा आठ लाख रुपये न देता व्यावसायिकाची एका पोलिस हवालदाराने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदाराविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.