Pune : मुलीला पालकांच्या ताब्यात दिले अन्...

मोटारीच्या धडकेत मृत्यू झालेले पोलिस हवालदार समाधान कोळी यांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच एका हरवलेल्या मुलीला तिच्या आर्इ-वडिलांच्या हवाली केल्याचे पुढे आले आहे.
Pune
Pune sakal
Updated on

पुणे : मोटारीच्या धडकेत मृत्यू झालेले पोलिस हवालदार समाधान कोळी यांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच एका हरवलेल्या मुलीला तिच्या आर्इ-वडिलांच्या हवाली केल्याचे पुढे आले आहे. त्याबाबतचा फोटो त्यांनी पोलिसांच्या ग्रुपवर शेअर केला होता. कोळी यांचा तो शेवटचा फोटो ठरला. ज्यात मुलगी, कोळी आणि त्यांचे सहकारी संजोग शिंदे आहेत.

पोलिसांच्या ग्रुपवर एक वाजून सात मिनिटांनी फोटो अपलोड करण्यात आला. याबाबतची सविस्तर माहिती अशी, की गस्तीवर असलेले कोळी आणि शिंदे यांना खडकी भागातील एका बसस्थानकावर रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी आढळून आली. दोघांनी तिची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी मुलीकडून तिच्या आई-वडिलांचा नंबर घेऊन मुलगी सापडल्याची माहिती दिली. मुलगी व तिच्या घरचे पिंपळे सौदागरमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना बसस्थानकाजवळ बोलावून घेतले. सर्व खातरजमा करून मुलीला त्यांच्या ताब्यात सोपविले. या कामगिरीचा फोटो पोलिस कोळी आणि शिंदे यांनी रात्री एक वाजून सात मिनिटांनी पोलिसांच्या ग्रुपवर शेअर केला होता. त्यानंतर दोघे खडकी बाजार भागात आले. तिथून ते बोपोडी भागात आले असताना अपघात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.