Police Constable Satish Mundhe
sakal
शिरूर - शिरूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी स्वतःसह वरिष्ठांच्या नावाने ९५ हजार रूपयांची लाच घेतलेला आणि लाच स्विकारताना घटनास्थळी दाखल झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या हातावर तुरी देऊन लाचेच्या रकमेसह पसार झालेल्या पोलिस हवालदाराला एसीबीच्या पथकाने आज येथील नगर परिषद कार्यालय परीसरात सापळा रचून पकडले.