dattatray gadekar and jyoti kale
sakal
उरुळी कांचन - वेळ पहाटे २.४५ ची, स्थळ-उरुळी कांचन, येथील तळवाडी चौक, रस्त्यावर चिटपाखरू नाही अन् पत्नीला सुरु झाल्या प्रसूतीच्या वेदना... पती राजू काळे झाला सैरभैर... मदतीला आला रात्रपाळी वर असलेले पोलीस कर्मचारी... असह्य झालेली महिला.... परगावावरुन मजूरीसाठी आलेले दांपत्य... मदतीसाठी कोणाकडे धावा घ्यायचा म्हणून निर्माण झालेला कठिण प्रसंग... अखेर ११२ पोलिस सहाय्यता क्रमांकावर साधलेला संपर्क... या संपर्कातून घटनास्थळी धाव घेतलेल्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांच्या माणुसकीच्या भावनेतून त्या महिलेची रस्त्यावरच झाली प्रसुती. अन् बाळ व बाळंतीण सुखरुप राहण्याची घटना उरुळीकांचन येथे बुधवारी (दि.७) घडली.