
पुणे/औंध - मैदानावर खेळून शाळेत आल्यानंतर विद्यार्थिनी कपडे बदलताना शिपायाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी शिपायाविरूद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पाषाण परिसरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार समोर आल्यानंतर पालक आक्रमक झाले होते.