esakal | वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा

वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी सून व मुलगा यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर - वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी सून व मुलगा यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

इंदुबाई जगन्नाथ कुदळे (वय ६२, रा. पुरदंर सोसायटी, उरळी कांचन, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलिसांनी विकास जगन्नाथ कुदळे व व त्याची पत्नी सायली (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदुबाई कुदळे यांच्या पतीचे निधन नऊ वर्षांपूर्वी झाले असून, सहा वर्षांपासून इंदुबाई या मुलगा विकास व सून सायलीसह उरुळी कांचन येथे राहात आहेत. विकास नांदुर (ता. दौंड) येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. विकास व सायली यांनी पाच वर्षांपूर्वी इंदुबाई यांच्याशी गोड बोलून, फ्लॅट घेण्यासाठी इंदुबाईकडून रोख रक्कम व दागदागिने काढून घेतले होते. मात्र मागील काही दिवसांपासून विकास व सायली यांनी इंदुबाई यांना त्रास देण्यास सुरवात केली होती. यातूनच दोन महिन्यांपूर्वी विकास याने इंदुबाईंना घराबाहेर काढले होते. घरात घेण्यासाठी इंदुबाई यांनी वारंवार विनंती करूनही नकार दिल्याने अखेर इंदुबाई यांनी विकास व सायली यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर पुढील तपास करीत आहेत

loading image
go to top