

पोलिस असल्याचे भासवून बारा लाखांना गंडा
पिंपरी : पोलिस असल्याचे भासवून निगडी प्राधिकरणातील एका ५९ वर्षीय व्यक्तीकडून ११ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात सामील असल्याचे सांगत त्याला अटकेची भीती घालण्यात आली. पोलिसांनी शुक्ला, संदीप रावत अशा नावांच्या व्यक्तींविरुद्ध स्वतःला सीबीआय अधिकारी सांगणारा सिग्नल ॲपवरील करण शर्मा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तुमच्या मोबाइल क्रमांकावरून महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवून बेकायदा जाहिराती पाठविण्यात आल्याचे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून एका बँक खात्यावर ११ लाख ९० हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले गेले.
---------------
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : तळवडे येथील रुपीनगर परिसरात दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी यासिन इद्रिस शेख (रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक काळे, ओम्या ऊर्फ ओंकार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी त्यांच्या मित्रासह रुपीनगर येथे हॉटेलजवळ थांबले होते. आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. कानावर व डोळ्याजवळ धारदार हत्याराने वार करून त्यांनी फिर्यादीला गंभीर जखमी केले.
-----------
कंटेनरचालकाची दुचाकीला धडक
पिंपरी : मद्यपान करून कंटेनर चालविणाऱ्या चालकाने त्याच्या ताब्यातील भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथील संतोषीमाता चौकात घडली. या प्रकरणी रोहन तुकाराम शिंदे (रा. नेहरूनगर) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दीपकसिंग हनुमंत सिंह (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी दुचाकीवरून संत तुकारामनगरच्या दिशेने जात होते.
----------------
विक्रीसाठी गांजा बाळगणारा अटकेत
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मोशी येथे करण्यात आली. तुषार गणेश थोरात (रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.