Pune Crime : वारजेत पोलिस पथकावर गोळीबार; एक पोलीस जखमी,‌ गोळीबार करणारे पाच जणाला अटक

ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
The gun was removed due to an argument during a meal
The gun was removed due to an argument during a mealsakal

Pune crime - वारजे माळवाडीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शाहू वसाहत (जेएनएनआरयुएम पुनर्वसन प्रकल्प)मध्ये कोंबिंग ऑपरेशन करीत होते.

तेथून परत येताना रोझरी स्कूलच्या जवळ एक आठ ते दहा जणांचे टोळके होते. त्या टोळक्यातील व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिस त्यांच्याकडे जात होते तेवढ्यात समोरून गोळीबार झाला. त्यावेळी पोलिसानी देखील त्यांच्यावर हल्ला गोळीबार केला. या घटनेत एक पोलिस जखमी झाला असून त्या टोळक्यातील पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत, फौजदार राहुल दरबार पवार (वय ३७) यांनी याबाबत वारजे पोलिस ठण्यात तक्रार दिली आहे. अमोल अंकुश लामतुरे (वय २७, रा.आंनदनगर पोस्ट ऑफिसजवळ,लातुर. सध्या रा.पुणे रेल्वे स्टेशन परीसर), राजु पुनीचंद शिंदे (वय ३९, रा पुणे स्टेशन परीसर),

सचिन मारूती खैरे (वय ३०, रा. भुगाव, ता. मुळशी), गणेश मारूती खैरे (वय ३२, रा. स.नं. ३३, सुभाष बराटे चाळ, दत्तनगर, वारजे), अक्षय उध्दव सोळुंके (वय २२, रा.स.नं. ३३, सुभाष बराटे चाळ, दत्तनगर, वारजे) , त्यांचे चार साथीदार पळून गेले आहेत. तसेच या घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद दाखल केला आहे.

यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल श्री.कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पकडले.

उर्वरित चार आरोपी पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, त्यामध्ये जिवंत चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे.

The gun was removed due to an argument during a meal
Police: राज्यात पोलिस नाईक संवर्ग रद्द! हिंगोली जिल्हा पोलिस दलात पदांचा सुधारित आकृतिबंध

ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.

या आरोपिणी १४ दिवसा करीता कोणतेही घातक शस्त्र बाळगण्याचा मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करुन बेकायदेशीरपणे व अनाधिकारपणे आपले कब्जात एक अग्निशस्त्र, ४ जिवंत राऊंड, २ लोखंडी कोयते, लोखंडी पाईप, लोखंडी कटावणी, हातोडी, स्क्रुड्रायव्हर, पक्कड व कटर अशी साधने जवळ बाळगली होती.

The gun was removed due to an argument during a meal
Mumbai police Crime : मुंबई पोलिसांच्या पथकावर संभाजी नगरमध्ये हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक

या ठिकाणावरील मेकॅड्रॉनिक्स या इमारतीच्या शेजारी असलेल्या एसबीआय बँकेच्या एटिएमवर दरोडा टाकण्याचे उद्देशाने दरोडयाची तयारी करुन एकत्रित आले होते.

म्हणुन त्यांचेविरुध्द सरकारतर्फे फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद आहे. याचा तपास गुन्हे शाखा, युनिट ३ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com