
पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या संगणक अभियंता तरुणीवरील अत्याचार प्रकरणात कोंढवा पोलिसांनी तरुणीच्या मित्राला नोटीस बजावली. तरुणाला अटक करण्यात येणार नाही. मात्र, त्याने तपासात सहकार्य करावे, पोलिसांनी बोलाविल्यानंतर ठाण्यात हजर होण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.