Pune Crime : रस्त्यावरील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; चार हजार सराईत गुन्हेगार ‘रडार’वर

Latest Pune News: पुणे शहरात आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर खुलेआम शस्त्रे मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी गुन्हे शाखेने ठोस ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे.
pune crime news
crimeesakal
Updated on

पुणे - शहरात आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर खुलेआम शस्त्रे मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी गुन्हे शाखेने ठोस ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल ३७ हजारहून अधिक सराईत गुन्हेगारांवर विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील विशेषतः गंभीर गुन्ह्यांतील चार हजार सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीची ‘कुंडली’ तयार

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी हा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. शहरातील चार हजार गुन्हेगारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपशीलवार माहिती संकलित केली जात आहे.

यात त्यांच्यावर दाखल असलेली गुन्हेगारी प्रकरणे, न्यायालयीन आरोपपत्रांची स्थिती, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पॅटर्न आणि त्यांच्यावर पूर्वी झालेल्या प्रतिबंधात्मक कारवाया यांचा समावेश आहे.

विशेषतः संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), एमपीडीए, तडीपार, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, तसेच शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांचा अभ्यास केला जात आहे.

सर्व परिमंडळाच्या पोलिस उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले असून, प्रत्येक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुन्हेगारांवर लक्ष ठेवणार आहेत. गुन्हेगारांवर किती गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर किती वेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे, हे सर्व तपासून त्या गुन्हेगारांविरोधात तत्काळ हालचाली सुरू करण्यात येणार आहेत.

गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करणार

सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या, दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर लोकेशन, सोशल मीडियावरील हालचाली आणि गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.

पोलिस स्वत:हून विविध भागात कोपरा सभा घेतील. तसेच नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भेटून त्यांच्या तक्रारी जाणून गुंडांवर तातडीने कारवाई करतील. रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना भीतीमुक्त वातावरण देणे, गुन्हेगारांवर वचक ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रस्त्यांवरील गुंडगिरी पूर्णपणे संपवण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.

- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

मागील पाच वर्षांतील आकडेवारी (२०१९ ते २०२४)

गुन्ह्याचे स्वरूप- गुन्हेगारांची संख्या

मकोका- १५६७

एमपीडीए- २९०

तडीपार- १३०२

खून- १३८८

खुनाचा प्रयत्न- ४५२९

जबरी चोरी- २७६७

घरफोडी- २७२२

शस्त्र बाळगणे- ८०४

वाहनांची तोडफोड- २६५

अमली पदार्थ बाळगणे- १०१६

वाहन चोरी- ४२४७

सोनसाखळी हिसकावणे- ३९३

बलात्कार- २५२५

विनयभंग- ३९३६

मारहाण करून दुखापत करणे- ९६५७

एकूण- ३७४०८

‘रडार’वरील गुन्हेगार (परिमंडळनिहाय)

परिमंडळ एक- ४३०

परिमंडळ दोन- ७७१

परिमंडळ तीन - ६७५

परिमंडळ चार- ९०३

परिमंडळ एक- १०६५

एकूण- ३८४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com