पुणे - गुन्हे शाखेने पद्मावती भागात केलेल्या कारवाईत स्वारगेट पोलिस ठाण्यातील एक पोलिस अंमलदारच गांजा विक्री प्रकरणात सहभागी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नवनाथ कांताराम शिंदे असे त्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्या पोलिस अंमलदारास निलंबित केले.