पुणे पोलिस अलर्ट मोडवर, १२ जुलैपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पुण्यात पोलिसांना २८ जून ते १२ जुलैपर्यंत ऑन ड्युटी रहावं लागणार आहे.
Pune Police News |Maharashtra Politics News
Pune Police News |Maharashtra Politics Newssakal

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. दिवसेंदिवस अनेक राजकीय बदल घडत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस दलाने निर्णय घेतला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पुणे पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १२ जुलैपर्यंत वैद्यकीय सुट्टी वगळता इतर सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. (pune police alert maharashtra politics)

Pune Police News |Maharashtra Politics News
दुसऱ्यांना पान टपरीवाले म्हणणारे आधी कारकून होते; मनसेचा राऊतांना टोला

राजकीय परिस्थितीमुळे पुण्यासह महत्वाच्या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांना २८ जून ते १२ जुलैपर्यंत ऑन ड्युटी रहावं लागणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे पोलिस दलाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पोलिसांना सुट्ट्या घेता येणार नाहीत.(Pune News)

Pune Police News |Maharashtra Politics News
बंडखोर आमदारांचं निलंबन पुढे ढकललं; 12 जुलैपर्यंत खलबतांना वेळ

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी बंड केलं आणि गुवाहाटीत आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinede) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. तर, नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com