Rashmi Shukla : पोलिस अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे
Technology Adoption : बदलत्या परिस्थितीत आणि कायद्यांच्या बदलांच्या अनुषंगाने पोलिस अधिकाऱ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी केले.
पुणे : ‘‘नवीन बदलत्या परिस्थितीत आणि कायद्यातील बदलांच्या पार्श्वभूमीवर तपासी अधिकाऱ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे,’’ असे आवाहन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले.