Pune Parking : पोलिसांची ना हरकत असेल तर महापालिकाही देणार परवानगी

मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामासाठी २०१८ पासून खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटी दरम्यानचा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने नो पार्किंग करण्यात आले आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे - कर्वे रस्त्यावरील नो पार्किंग बंद करून तेथे पार्किंगची व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्यास हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांचे पत्र अद्याप प्राप्त झाले नाही, पण पोलिसांना पार्किंग सुरू करण्यास हरकत नसेल तर आम्ही परवानगी देऊ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामासाठी २०१८ पासून खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटी दरम्यानचा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने नो पार्किंग करण्यात आले आहे. त्याचा परिणाम कर्वे रस्‍त्यावरील व्यवसायावर झाला आहे. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावी अशी मागणी कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनने केलेली आहे.

तर महापालिकेने कर्वे रस्त्यावर पार्किंगला परवानगी न दिल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी दिला आहे. या ठिकाणची मागमी पाहता वाहतूक पोलिसांनी कर्वे रस्त्यावर अंशतः पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामध्ये ९ ठिकाणांचा समावेश आहे. त्यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘रस्त्यावर पार्किंग करायची की नाही याचा निर्णय पोलिस घेतात. कर्वे रस्त्यावर पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी पोलिसांची तयारी असेल तर आमची काही हरकत नाही. पोलिसांचे पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. मिळाल्यांनतर त्यावर लगेच कार्यवाही करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rahul gandhi chhatron ki goonj Event in Pune
Hinjewadi IT Park pune
Koregaon Park Water Supply
The ₹2.5 crore parking project had remained non-functional due to poor maintenance and severe structural deterioration.
Marathi News Esakal
www.esakal.com