Pune Police Raid Illegal Country Liquor
sakal
पुणे - शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून विषारी रसायनयुक्त गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हे दाखल केले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली दारू मानवी आरोग्यास अपायकारक आणि जीवितास मोठा धोका निर्माण करू शकेल अशी होती. वारजे येथील रामनगर परिसरात बेकरीजवळ सार्वजनिक रस्त्याच्या कडेला काहीजण गावठी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.