तीन राऊंड सगळ्यात पुढे, अंतिम राऊंडला दोन पावले दूर असतांना कोसळला

तीन राऊंड सगळ्यात पुढे, अंतिम राऊंडला दोन पावले दूर असतांना कोसळला

Published on

धावताना मृत्यूने
वाटेत गाठले
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २१: लोहमार्ग पोलिस भरतीच्या प्रक्रियेत सोळाशे मीटर धावताना तीन फेरी पूर्ण केल्यानंतर शेवटच्या फेरीत अचानक कोसळल्याने सांगलीच्या एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर घडली. संग्राम धोंडीराम शिंदे (वय २४, रा. मोराळे, ता. पलूस, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मूळ सांगलीतील असलेला संग्राम हा बीड येथून रात्री भरती प्रक्रियेसाठी बसने शहरात आला होता. तो गेवराईतील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आज सकाळी लोहमार्ग पोलीस भरतीत छाती, उंची, बायोमेट्रिक यासह इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर सोळाशे मीटर धावताना मैदानाचे चार राऊंड पूर्ण करावे लागतात. पहिले तीनही राऊंड संग्राम आघाडीवर होता. चौथ्या राऊंडमध्ये तो थोडा मागे पडला. दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असताना तो जोर लावून धावला. दोन पावले दूर असतानाच तो अचानक कोसळला. पोलिसांनी तत्काळ संग्रामला रुग्णवाहिकेने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासले असता त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com