Police Recruitment : वर्दी मिळाली, नाहीतर होती बकरी; धनंजय गलांडे, सागर मोरे यांनी भावना व्यक्त केल्या

‘कुटुंब मोठं पण परिस्थिती बेताची. आम्ही शिकलो, पदवीधर झालो. त्यामुळे आम्ही काहीतरी करून दाखवावं, अशा घरच्यांच्या अपेक्षा.
Dhananjay sagar rutvik
Dhananjay sagar rutviksakal
Updated on

सोमेश्वरनगर - ‘कुटुंब मोठं पण परिस्थिती बेताची. आम्ही शिकलो, पदवीधर झालो. त्यामुळे आम्ही काहीतरी करून दाखवावं, अशा घरच्यांच्या अपेक्षा. पण पदवी घेऊन कुठल्याच नोकरीची शक्यता नव्हती. मग सेनादलात भरतीचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

पुणे पोलिस, एसआरपीएफला वेटिंगला राहिलो. आता मुंबई पोलिस भरतीची संधी साधली नाही तर बकरी वळण्याशिवाय पर्याय नाही, हे जाणवलं. वर्षभर रात्रंदिवस मेहनत केली आणि अखेर वर्दी मिळाली,’ अशा शब्दात धनंजय गलांडे, सागर मोरे यांनी भावना व्यक्त केल्या.

मुर्टी-मोढवे (ता. बारामती) गावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलिस भरतीची परंपराच पडली आहे. मुंबई शहर पोलिस भरतीचा निकाल लागला आणि त्यामध्ये गावातले धनंजय जनाबाई सायबू गलांडे, सागर सविता दगडू मोरे आणि ऋत्विक रेखा बाबासाहेब जावळे हे तीन तरुण अनुक्रमे १३८, १३५ व १३२ असे उत्तम गुण घेऊन भरती झाले आहेत.

तिघांच्याही कुटुंबात ते पहिलेच सरकारी नोकरदार आहेत, तिघेही सामान्य व परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील आहेत. तिघेही मुर्टीमधील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थी असून चंद्रस्मृती व विवेकानंद अभ्यासिकेत सोबतच भरतीसाठी धडपडत होते. पांडुळेवाडा वस्तीवरील धनंजय गलांडे याचे कुटुंब शेतकरी, मेंढपाळ आहे. आई-वडील शेतात तर चुलते बकरी घेऊन कोकणात जातात. मोठा भाऊ शेतीच करतो.

नोकरीच्या आशेने धनंजय बीएस्सी झाला. फार्मसीही केली. अखेरीस पोलिस भरतीचा खडतर प्रवास त्याने पूर्ण केला. सागर मोरे मोरेवाडी वस्तीवरचा मुलगा. उत्कर्ष आश्रमशाळेत सातवीपर्यंत आणि नंतर रयतमध्ये आणि काकडे महाविद्यालयात बी.ए. झाला. चार-पाच वर्षी वेल्डींगचीही कामे केली. आर्मी, पुणे पोलिस, एसआरपीएफच्या परीक्षांमध्ये वेटींगवर राहिला. वर्दी त्याच्या कष्टाने अंगावर चढली आहे.

बांधकाम मजूराच्या मुलाचेही यश

ऋत्विक जावळे याचे आईवडील बांधकाम करणारे आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी गेली दोन वर्ष त्याने अभ्यासिकेत अभ्यासासाठी आणि मैदानावर सरावासाठी जिवाचे रान केले. तिघांनाही नितीन ननवरे, गणेश सावंत, मयूर कोळपे, चेतन कोळपे, महेंद्र जमदाडे, राजू बडदे आदींचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com