police recruitment maratha community candidates will be rigged few days to get certificates maratha reservation
police recruitment maratha community candidates will be rigged few days to get certificates maratha reservationSakal

Police Recruitment : मराठा समाजातील उमेदवारांची धांदल उडणार; प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस

पोलिस भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्जासाठी ५ ते ३१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : पोलिस भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्जासाठी ५ ते ३१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारने नुकत्याच दिलेल्या मराठा आरक्षणासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवल्या असल्या तरी या लाभासाठी मराठा उमेदवारांची मात्र धांदल उडणार आहे. कारण ३१ मार्चपर्यंत एसईबीसी आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र काढावी लागणार आहेत.

राज्य सरकारकडून अद्याप महसूल विभागाला ‘एसईबीसी’संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.सरकारने तब्बल १७ हजार ४३० जागांवर पोलिस भरती काढली आहे. सर्व ठिकाणी नव्या अध्यादेशानुसार मराठा समाजासाठी दहा टक्के जागा राखीव आहेत. त्यासाठी एसईबीसी (सामाजिक व आर्थिक मागास घटक प्रमाणपत्र) आणि नॉन क्रिमिलेयर (प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबद्दलचे प्रमाणपत्र) काढावे लागणार आहे.

दोन्ही दाखल्यांसाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागणार आहेत. अशात प्रशासन निवडणुकांच्या तयारीत असल्याने वेळेत दाखले मिळणे अधिक जिकिरीचे होणार आहे. याहून गंभीर बाब म्हणजे भरती जाहीर झाली पण अद्याप सेतू केंद्रांना व तहसील कचेऱ्यांना ‘एसईबीसी’ संदर्भातील मार्गदर्शक सूचनाच प्राप्त झालेल्या नाहीत. सेतू केंद्रचालक प्रमोद पानसरे म्हणाले, ‘‘एसईबीसी पोर्टल सुरू झाल्याचे दिसत आहे आणि प्रस्तावही येऊ लागले आहेत. मात्र, रीतसर सरकारी सूचनांची वाट पाहत आहोत.’’

पोलिस भरतीच्या प्रक्रियेबद्दल सांगता येणार नाही. मात्र, एसईबीसी दाखले देण्यासंदर्भात माझ्याकडे तरी अजून मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत. तरीही याबाबत पूर्ण माहिती घेतल्यावरच बोलता येईल.

- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com