

VRG26B06481 (या बातमीतील मुलांचे चेहरे ब्लर करावे.)
वैराग (ता. बार्शी) : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह पोलिस.
---
घराच्या ओढीने निघाले, पोलिसांनी परत आणले
बार्शीला पायी निघालेल्या आश्रमशाळेतील मुलांना दिली मायेची सावली
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. २३ : आई- वडिलांच्या आठवणीने व्याकूळ होऊन आश्रमशाळेतून कोणालाही न सांगता बार्शीकडे पायी निघालेल्या आठ ते नऊ चिमुकल्यांना वैराग पोलिसांनी तत्परता दाखवत सुखरूप परत आणले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, त्यांच्या संवेदनशील व मानवीय भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काळेगावचे पोलिस पाटील रतन घाईतिडके यांनी रविवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास काही लहान मुले काळेगाववरून बार्शीच्या दिशेने पायी जात असल्याची माहिती वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांना दिली. माहिती मिळताच निरीक्षक गावडे यांनी तत्काळ ‘डायल ११२’ पथकातील पोलिस कॉन्स्टेबल शरद पाटकर यांना घटनास्थळी पाठवून मुलांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
कॉन्स्टेबल पाटकर यांनी मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत ही सर्व मुले वैराग येथील माता स्वरूपाराणी आश्रमशाळेतील असल्याचे समोर आले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी शाळेतील कोणालाही न सांगता बार्शी येथील आपल्या घरी जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला होता. मुले घाबरलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत वैराग पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांना खाऊ देऊन आपुलकीने संवाद साधण्यात आला. ‘आई-वडिलांची खूप आठवण येत होती, म्हणून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो,’ असे मुलांनी पोलिसांना सांगितले.
यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेतील शिक्षक मनोहर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. सर्व मुलांना त्यांच्या ताब्यात देऊन सुखरूपपणे पुन्हा आश्रमशाळेत पाठविण्यात आले.
वैराग पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ही मुले सुरक्षितपणे परत मिळाली असून, त्यांच्या या हृदयस्पर्शी कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.