पोलिस उपनिरीक्षकास लाचप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बारामती पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली.

पुणे - अटकपूर्व जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बारामती पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब भीमराव जाधव (वय ५४), पोलिस शिपाई अजिंक्‍य लहू कदम (वय २८) असे ‘एसीबी’च्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्याविरुद्ध बारामती पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्ह्यामध्ये जाधव व कदम यांनी तक्रारदारास अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी एक लाखाची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये ५० हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदार यांना लाच देणे योग्य न वाटल्याने त्यांनी या प्रकरणी ‘एसीबी’कडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन ‘एसीबी’ने त्याची पडताळणी केली. त्यानंतर सोमवारी बारामती ठाण्यामध्ये सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police sub-inspector arrested for bribery in pune