लॉकडाऊनचे केले नाही पालन मग झाली तिघांना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन न केल्याबद्दल येथील न्यायालयाने तिघांना तीन दिवस कैद किंवा पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

बारामती : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन न केल्याबद्दल येथील न्यायालयाने तिघांना तीन दिवस कैद किंवा पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अफजल बनिमिया आतार (रा. श्रीरामनगर, बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा (रा. सूर्यनगरी, बारामती) व अक्षय चंद्रकांत शहा (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) या तिघांना ही शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

भविष्यात चारित्र्य पडताळणी किंवा शासकीय खाजगी नोकरीवर गदा येणार आहे. पासपोर्ट, शस्त्रपरवाना तसेच व्यवसाय परवाने मिळवितानाही या शिक्षेने अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी शासकीय लॉकडाऊनचे पालन करावे, बाहेर विनाकारण न फिरता घरातच राहिले पाहिजे, अन्यथा अशा नागरिकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शिरगावकर यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taken Action Against Peoples who not Follow Lock Down in Baramati