Coronavirus : पोलिसांकडून केली जातेय दुकानदारांवरही कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

गेले काही दिवस विनाकारण रस्त्यांवर फिरणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली होती, आता दुकानदारांचीही कारवाईच्या बडग्यातून सुटका नाही, हेच स्पष्ट झाले आहे. 

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र, दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, गर्दी नियंत्रित न करता धोकादायक पध्दतीने विक्री केल्याप्रकरणी बारामतीत पोलिसांनी चार दुकानदारांवर कारवाई केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेले काही दिवस विनाकारण रस्त्यांवर फिरणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली होती, आता दुकानदारांचीही कारवाईच्या बडग्यातून सुटका नाही, हेच स्पष्ट झाले आहे. 

दोन ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यासाठी सूचना न देणे, तशी व्यवस्था न करणे, गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना न केल्या प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

भारतीय दंड विधान संहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय तुळजाभवानी पिठाची गिरणी, साईनाथ जनरल किराणा स्टोअर्स, आनंद ड्रायफ्रुटस, वेलनेस फॉरेव्हेर मेडीकल शॉप या चार दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा-या दुकानदारांनी केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता ग्राहकांची व स्वताःची सुरक्षितता या कडे लक्ष द्यायला हवे, शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे नारायण शिरगावकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taking Action Against Shop Owner who not Follows Rules