
पुणे : महिलांविरोधातील गुन्ह्यांची प्रभावीपणे हाताळणी व्हावी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. जुलै महिन्यातच राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना विविध संवेदनशील विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.