खुमखुमी लई बेक्कार ! शस्त्र घेऊन WhatsApp Status टाकणाऱ्याला 'खाकी'चा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शस्त्र घेऊन WhatsApp Status टाकणाऱ्याला 'खाकी'चा दणका

शस्त्र घेऊन WhatsApp Status टाकणाऱ्याला 'खाकी'चा दणका

पुणे: कधी एखाद्या भाईच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापायचा असो, नाहीतर पिस्तुल, तलवार हातात घेऊन डान्स करणे असो....अशा अनेक प्रकाराचे छायाचित्र, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची खुमखुमी गुन्हेगारी वृत्तीच्या व 'भाई'चा आदर्श ठेवणाऱ्यांमध्ये जरा जास्तच दिसत आहे. अशाच एका चाकू हातात घेतलेले व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्या खुमखुमी बहाद्दाराला 'खाकी'चा दणका बसला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले.(Police Will Take Action Against person who took Whats App status with a weapon)

अनिकेत साठे (रा.आंबेडकर नगर, चंदन नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. घडलेला प्रकार असा, चंदन नगर येथील आंबेडकरनगर भागात राहणारा अनिकेत साठे या तरुणाने हातात शस्त्र घेऊन त्याबाबतचे छायाचित्र व्हॉट्सॲप स्टेटस ठेवेले होते.

हेही वाचा: अजित पवारांविरोधात पुरावा द्या, पोलिसांत तक्रार करेन; सुप्रिया सुळे

याबाबतची खबर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस कर्मचारी दीपक भुजबळ गुन्हे शाखा युनिट ४ यांना मिळाली. संबंधित तरुण हा चंदन नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबला असल्याचे तसेच त्याच्याजवळ आत्ता सुद्धा हत्यार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप जमदाडे, गणेश साळुंके, राजस शेख, दिपक भुजबळ, कौस्तुभ जाधव, सुरेंद्र साबले, स्वप्निल कांबळे यांनी सापळा रचून अनिकेत साठे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून तीनशे रुपयेचा लोखंडी कोयता जप्त केला. त्याच्याविरुद्ध भारताचा हत्यार अधिनियम कलम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस उपायुक्त लक्ष्मण बोराटे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

हेही वाचा: वाहनाची धडक बसून दोन हरणांचा मृत्यू

loading image
go to top