उद्योग 4.0 च्या धोरणांचा उत्पादकतेकडून स्वयंपुर्णतेकडे प्रवास

उद्योग 4.0 च्या धोरणांचा उत्पादकतेकडून स्वयंपुर्णतेकडे प्रवास
Updated on

पुणे - कोरोना महामारीचा परिणाम आता उद्योगांच्या दीर्घकालीन धोरणांवरही होणार आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानातून उदयाला आलेली चौथी औद्योगीक क्रांती म्हणजेच "उद्योग 4.0'च्या धोरणातही आता बदल करण्याची गरज उद्योग, संशोधन आणि प्रशासनातील धुरिनांकडून व्यक्त केली जात आहे. 

लॉकडाउन झालेल्या जगात उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सहकार्य सर्वच काही ठप्प झाले. पर्यायाने उद्योगांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी उत्पादकते बरोबरच अधिक स्वयंपुर्णतेकडे जाने अनिवार्य ठरले आहे. केवळ माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, स्मार्ट फॅक्‍टरी आणि पाश्‍चिमात्य उद्योगविश्वावर आधारित "उद्योग 4.0' साठीचे घोरणे आता स्वदेशी केंद्रित करावे लागेल, अशी गरज नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि.के. सारस्वत यांनी व्यक्त केली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या "स्मार्ट'वापरातून लॉकडाउनमध्ये उद्योग सुरू करणे आणि भविष्यात त्यांची वाढ करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. उद्योग जगतासह त्याच्याशी निगडित सर्वांनाच कोरोनाच्या छायेखालीच उद्योग सुरू करताना पुढील गोष्टींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे धडे ः 
1) कोरोनामूळे घ्यावयाच्या औद्योगीक संरक्षणात्मक धोरणांमध्ये उशीर 
2) संशोधन आणि विकासामध्ये संशोधन संस्थांसह उद्योगांमध्येही कमतरता 
3) खासगी कंपनी किंवा स्टार्टअपने तयार केलेली उत्पादने, सेवा किंवा इतर गोष्टींबद्दल सरकारी लालफितीची प्रक्रिया 

उद्योग 4.0 पुढील मुद्दयांचा होणार विचार 
- लघु, मध्यम आणि वाणिज्य क्‍लस्टरला प्राधान्य 
- उद्योग 4.0चे स्वदेशीकरण 
- कमी किमतीत उत्पादन आणि सेवा 
- सपोर्ट सिस्टिम, उदा. स्मार्ट सिटी, विमानतळ, इनोव्हेशन सेंटर 
- कामगारांसंबधीच्या धोरणात बदल 
- अर्थविषयक आणि करविषयक धोरणे 

उद्योगांच्या व्यवस्थापनासाठी.. 
- उदयोन्मुख नवतंत्रज्ञान 
- स्मार्ट सर्विलन्स 
- आवश्‍यकतेनुसार स्थानिक पातळीवर प्रणाली उभी करणे 
- ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना सेवा पुरविणे 
- अंतर्गत क्रयशक्ती किंवा उत्पादनात वाढ करणे 
- दुरस्थपद्धतीने काम करण्यासाठी (रिमोट वर्किंग) पायाभूत सुविधा उभ्या करणे 

उद्योगांनी हे तातडीने करावे.. 
1) नर्व्ह सेंटर ः उद्योग किंवा व्यवसायातील सर्व क्षेत्रातील माहितीचे संकलन, पृत्थक्करण आणि व्यवस्थापनासाठी मध्यवर्ती केंद्र स्थापन करणे. 
2) जोखीम आणि जबाबदारीचे व्यवस्थापन 
3) भागिदारांमध्ये समन्वय आणि विश्वासार्हता वाढविणे 
4) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक गोष्टींकडे लक्ष पुरविणे 
5) कंपनीच्या आर्थिक व्यवहारांत तरलता (लिक्विडिटी) 
6) उद्योगाचे आर्थिक आरोग्य सुदृढ करणे 
7)उत्पादन आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन 

उद्योग 4.0साठी होणार या कौशल्यांचा विचार 
- डिजिटल साक्षरता 
- कृत्रीम बुद्धिमत्ता आणि माहितीच्या पृत्थकरणाच्या आधारे नवीन उपाययोजना 
- समस्या निराकरणासाठी विचार 
- नवउद्योजकतेसाठी मानसिक खंबिरता 
- नवतंत्रज्ञानाच्या स्विकाराबरोबरच शिस्त 
- सायबर सिक्‍युरिटी ः खासगी माहितीचे संरक्षण 

उद्योग 4.0 साठीची गुरुकिल्ली 
1) संशोधन आणि विकास क्षेत्र  
- "एन्ड टू एन्ड टेक्‍नॉलॉजी सोल्यूशन'साठी प्रयत्न 
- संशोधक, स्टार्टअप, उद्योग, प्रशासन आणि सरकार यांच्यामधील बंध मजबूत करणे 
- संशोधन आणि विकासाला मिशन मोड मध्ये कार्यान्वित करणे 
- पूर्ण वेळ संशोधकांच्या नियुक्‍त्या वाढविणे 
- उद्योगांचा संशोधनात सहभाग आणि भारताला "आर ऍन्ड डी' हब म्हणून जगासमोर आणणे 
- उद्योगांना आवश्‍यक मनुष्यबळ निर्मिती 

2) उद्योग आणि व्यवसाय ः 
- उद्योगांच्या सर्व सेवांमध्ये डिजीटलायझेशन 
- आंतरराष्ट्रीय सहकार्यातून उद्योगांची स्वयंपूर्णता वाढविणे 
- शेती आणि लघु-मध्यम उद्योगांत गुंतवणूक वाढविणे 
- कच्च्यामालासाठी आयातीवरील अवलंबत्व कमी करणे 
- अत्याधुनिक उत्पादन पद्धत आणि बिझनेस मॉडेलचे कार्यान्वयन 

वर्क फ्रॉम होमच्या कल्चरमुळे विशिष्ट उद्योगांच्या खर्चात कपात होत आहे. त्याप्रमाणात त्यांच्या उत्पादकतेत कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही. तसेच, शिक्षण, वैद्यकीय आणि नेटवर्किंग क्षेत्रात ऑनलाईन काम करण्याचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या सोबत राहून आपल्याला काम करावे लागणार आहे. त्याचा परिणाम औद्योगिक धोरणांवर होणार हे निश्‍चित. 
- भूषण केळकर, अर्थतज्ज्ञ. 

कोरोना नंतरचे उद्योग जगत अधिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे झुकलेले असेल. शाश्‍वत विकासासाठी उद्योग, शिक्षण व संशोधन संस्था आणि स्टार्टअप यांच्या समन्वय असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी संबंधित सर्व भागीदार संस्था प्रयत्नशील आहे. 
- प्रा. के.विजयराघवन, देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार 

कोरोनाच्या सावटाबरोबरच उद्योगांना नवीन सुरवात करावी लागणार आहे. आता डिजीटलायझेशन बरोबरच रोबोटीक्‍स, उत्पादन आणि वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरणाचा विचार करावा लागणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांसह भागीदारांच्या आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे आता जास्त लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल 
- डॉ. व्ही.के.सारस्वत, सदस्य, नीती आयोग. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com