
तळेगाव दाभाडे : मावळातील दोन नगर परिषदा, नगर पंचायत, तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या काही प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, प्रभागरचना आणि आरक्षण पद्धतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.