

पुणे - पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता. २३) अर्ज भरताना फक्त भाजपच्याच उमेदवारांचे अर्ज सादर झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे. या निवडणुकीत भाजपने महिलांना जास्त संधी दिली आहे. या पदाची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.