

जरांगे, शिंदेंना बदनाम करण्याचा डाव
पृथ्वीराज चव्हाण; ‘गोकूळ’द्वारे परिवर्तनाची चाहूल
कऱ्हाड, ता. २४ ः पैशाचा आरोप करून मनोज जरांगे-पाटलांचे मराठ्यांचे नेतृत्व संपवायचे, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव रचला जातोय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी कोल्हापूरच्या गोकूळमध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा झालेला विजय ही देशातील परिवर्तनाची चाहूल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. चव्हाण त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनोज जरांगे-पाटील व एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावर ते म्हणाले, ‘‘पाचशे कोटींचा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. थोडेसे जरी काही सत्य असलं, तर मग कुठे चाललाय महाराष्ट्र असा विचार मनात येतो. मात्र, या प्रकरणात एका दगडात दोन पक्षी मारले जात आहेत. जरांगे-पाटील यांचे नेतृत्व संपून टाकायचं, पैसे स्वीकारून आंदोलन संपवल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला जो करार केला होता त्यांनीच सगळं घडवून आणले, असे दाखवून एकनाथ शिंदेंसारख्यांची बदनामी केली जात आहे. त्यांचेच मित्र तो डाव आखत आहेत. त्या क्लिपमध्ये जे कलाकार आहेत. ते सर्वांना माहितीचे आहेत. त्या सगळ्या प्रकाराची न्यायिक वैज्ञानिक तपास होण्याची गरज आहे. त्यातील तांत्रिक बाजू भक्कमपणे तापासली पाहिजे. तरच तो आवाज कोणाचा आहे. तो आवाज खरंच फोनच्या कॉन्फरन्स कॉलचा आहे, की त्यात कुणीतरी धरून आणलेला आहे, तेही कळेल.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘कोल्हापूरला जनशक्तीविरोधात सत्ता, सत्तेतून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग, धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न, पैसे असे सगळे प्रकार झाले, तरीही महायुतीला तेथे यश आले नाही. तीच स्थिती देशभरात आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यावर फरक दिसला. निवडणूक आणि देशातील वातावरण यांना एकत्रित करून पाहिल्यारा परिवर्तन अटळ आहे.’’
--------
चौकट
..................
आता एक छायचित्र येणे बाकी
एपस्टीन फाईलवर ते म्हणाले, ‘‘हरदीपसिंह पुरींच्या मुदतीचा एपस्टीन फाईलशी संबंध असल्याचा दावा केला होता. तो खरा ठरला. तीन नावे घेतली होती. त्यापैकी दोघांची छायाचित्रे आली. आता एक छायचित्र येणे बाकी आहे. केंद्र सरकारने पुरींना हळूहळू बाजूला केले आहे. एपस्टीन प्रकरणात ट्रम्पही धोक्यात आहेत. ट्रम्पना महाभियोगाला सामोरं जावं लागू शकत असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात परिवर्तन अटळ आहे.’’
.....................
.
टेंभूत चारा उत्पादनाचा प्रस्ताव
दुष्काळाबाबत ते म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली आहे. कऱ्हाडच्या कृषी महाविद्यालयाला जी टेंभूत जमीन दिली, ती डोंगराळ आहे. त्या जमिनीला टेरेसिंग करून तिथे चारा उत्पादन करण्याचा प्रस्ताव महाविद्यालयाने दिला आहे. त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. दुष्काळी परिस्थितीत तो प्रस्ताव मंजूर करून शासनाने चारा तयार करावा. तो हमीभावाने विकत घ्यावा.’’
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.